पुढच्या निवडणुकीपूर्वी पाच लाख ईव्हीएम बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ष 2029मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे पाच लाख जुनी मतदान यंत्रे (ईव्हीएम) बदलण्यात येणार असून जवळपास पाच लाख मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. देशात सध्या किती मतदान यंत्रे उपलब्ध आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (पान 1 वरून) आणखी किती यंत्रे खरेदी केली जाणार आहेत, याबाबत माहितीच्या अधिकारा अंतर्गत निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली होती. त्यावर उत्तर देताना आयोगाने सांगितले की, 2024च्या लोकसभा निवडणुकीत 10.52 लाख मतदान केंद्रांवर मतदान झाले. 2029च्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या 15.38 लाखांपर्यंत जाऊ शकते. सुमारे 46 टक्क्यांची वाढ मतदान केंद्रांमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या 30.48 लाख बॅलेट युनिट आणि 21.92 लाख कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. मात्र पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी 3.57 लाख बॅलेट युनिट आणि 1.25 लाख कंट्रोल युनिट खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र जवळपास तेवढेच ईव्हीएम बदलण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले.

खरेदीसाठी 486 कोटींचा खर्च

सध्या 30.48 लाख बॅलेट युनिट आणि 21.92 लाख कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी 3.57 लाख बॅलेट युनिट आणि 1.25 लाख कंट्रोल युनिट खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र जवळपास तेवढेच ईव्हीएम बदलण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 486 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.