देशातील कुठलेही सरकार संविधान धोक्यात घालू शकत नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विश्वास

हिंदुस्थानचे संविधान आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे, देशातील कुठलेही सरकार संविधानाला धोक्यात घालू शकत नाही असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत सातत्याने मतदान वाढले आहे, म्हणजेच जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे असेही बिर्ला म्हणाले. आज सविंधान दिन आहे, त्यानिमित्ताने बिर्ला म्हणत होते.

लोकसभा संसद सत्रादरम्यान बिर्ला म्हणाले की सदनाची कार्यवाही आदराने चाली पाहिजे. प्रत्येक सदस्याने आपले मत मांडले पाहिजे आणि प्रत्येक सदस्याचे आचरण नियमांना धरून असले पाहिजे. संविधान आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. देशातील कुठलेही सरकार आले वा गेले, ते संविधान धोक्यात नाही घालू शकत. गेल्या काही वर्षात सातत्याने मतनादानाचे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ नागरिकांच्या मनात लोकशाहीबद्दल विश्वास दृढ होत आहे असेही बिर्ला म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या