लोणीकंद परिसरातील हातभट्ट्यांवर पोलीसांची धडक कारवाई, 9 जणांवर गुन्हे दाखल

502

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव शिंदे, तुळापूर, पेरणे, वाडेबोल्हाई,सास्टे, वाडेगाव, कोलवडी, केसनंद येथे चालू असलेल्या बेकायदेशीर हातभट्ट्यांवर लोणीकंद पोलिसांनी धाडी टाकून त्या उद्ध्वस्त केल्या. अवैध हातभट्टीची दारू तयार करून विक्री करण्याऱ्या नऊ जणांवर यावेळी कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये बेकायदेशीरपणे चालू असलेल्या हातभट्टीच्या अड्यांवर लोणीकंद पोलिसांनी मोठी कारवाई केली.

वडगाव शिंदे, तुळापूर, पेरणे, वाडेबोल्हाई, सास्टे, वाडेगाव, कोलवडी, केसनंद येथे अवैध हातभटटी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . या कारवाईमध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आली तर 3 आरोपी फरार झाले.लोणीकंद पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये किंमतीचे एकूण 15 हजार लिटर दारू बनवण्याचे रसायन याबरोबरच 4 हजार रुपये किंमतीची 70 लिटर तयार गावठी दारू नष्ट करण्यात आली.

लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत पडळकर, पो. हवा.सदा गायकवाड, पो. ह. सकाटे, पो.ना. मोहन अवघडे, पो.ना.श्रीमंत होनमाने, पो.कॉ. संतोष मारकड, पो. कॉ. पिलाने,पो.कॉ. सूरज वळेकर, पो.कॉ. विनोद माने, पो. कॉ. व्यहवारे, पो.कॉ. प्रतिक्षा पानसरे या पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या