केंद्रेवाडीत 6 सैनिकांची घरे फोडून लाखों रुपयाचे सोने व रोकड लंपास

602

अहमदपूर तालुक्यात केंद्रेवाडी हे एक छोटे गाव या गावाची दुसरी ओळख म्हणजे सैनिकांची वाडी. काल रात्रीच या गावात चोरट्यांनी सहा केंद्रे कुटुंबीयांच्या घरात घरफोड्या झाल्या असून सोने व रोख रकमेच्या चोऱ्या चोरट्यांनी केल्या आहेत आहेत. दत्तात्रय पाटलोबा केंद्रे यांचे पाच तोळे सोने व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरी गेली आहे.

मनोहर श्रीरंग केंद्रे यांचे 20 ग्राम सोने, विश्वंभर ग्‍यानोबा केंद्रे यांचे 20 ग्राम सोने व साठ हजार रुपये शेतातील मालविक्री रक्कम चोरीला गेली. अशोक पंढरी केंद्रे यांचे 15 ग्रॅम सोने, विश्वनाथ एकनाथ केंद्रे यांचे 10 ग्राम सोने व 5000 रोख रक्कम तसेच यशवंत नारायण केंद्रे यांच्या घरातील सर्व सामानाची नासधूस करत सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले.

या चोरीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामीण जनता भयभीत झाली आहे. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला असल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या