“महाराज आपल्या दर्शनाने मी पवित्र झालो आहे आता मी निघून जातो! “

>> निळकंठ कुलकर्णी

।।  श्री गुरूदेव दत्त ।।

हिंगोली गावचे श्री.हेमराज मारवाडी यांच्या मातु:श्री पीडाग्रस्त होत्या. त्यांना वस्त्राचेही भान राहत नसे. ते श्रीस्वामी महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांनी आपल्या आईची सर्व हकिकत त्यांना सांगितली. श्रीस्वामी महाराजांनी त्यांना एक यंत्र तयार करून दिले व त्याचा सर्व विधी सागितली त्याप्रमाणे केल्यावर, त्याच्या मातु:श्रींना पूर्ण बऱ्या झाल्या. श्री. हेमराज आपल्या मातु:श्रींना श्रीस्वामी महाराजांच्या दर्शनाला देखील आले.

हावनूर येथे राहणाऱ्या वैष्णव संप्रदायातील एक बाई आजारी असून अंथरुणाला खिळून होत्या. कोणत्याही औषधाने त्यांना गुण येईना. श्रीस्वामी महाराजांची कीर्ती त्यांना माहिती होती. ते स्मार्त असल्यामुळे त्यांच्याकडून औषध कसे घ्यावे? असा त्यांच्या मनात आला. पण शेवटी सर्व लोकांच्या आग्रहावरून त्या श्रीस्वामी महाराजांच्याकडे आणले गेले. त्यांना अगदी उचलूनच आणावे लागले. त्या बाईंना पाहताच श्रीस्वामी महाराज म्हणाले; “या बाईंना काहीही रोग झालेला नसून पिशाच्चबाधा झालेली आहे !” त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी त्या बाईंच्या अंगावर शिंपडले. तेव्हा ते पिशाच बोलू लागले; ” महाराज! गेल्या जन्मी या बाईने मला खूप त्रास दिला आहे. म्हणून मी हिला पीडा देतो. आपल्या दर्शनाने मी पवित्र झालो आहे. आता मी निघून जातो! ” त्यानंतर त्या बाईंना खूप बरे वाटले.

तरी सुद्धा श्रीस्वामी महाराजांनी त्यांना एक यंत्र तयार करून दिले व ते गळ्यात बांधायला सांगितले. एक जप सांगून, त्याचे अनुष्ठान करायला सांगितले. ते जपाअनुष्ठान पूर्ण होताच त्या बाई पूर्णपणे बऱ्या झाल्या.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या