ट्रेनचं तिकीट हरवलं तर? घाबरू नका, ‘या’ टिप्स करा फॉलो

1 . रेल्वेतून प्रवास करणं हे अन्य प्रवासापेक्षा स्वस्त आणि सुरक्षित प्रवासापैकी एक मानलं जातं. त्यासाठी अनेक जण महिनाभरापूर्वी रेल्वेचे तिकीट काढून ठेवतात.

2 . प्रवास करण्याआधी ट्रेनचं तिकीट हरवलं किंवा प्रवास करण्याच्या गडबडीत घरी विसरून गेल्यास काय करावं हे सूचत नाही. असं झालं तर घाबरून जाऊ नका.

3 . प्रवासात सर्वात आधी ट्रेनमधील टीटीईला कळवा. त्यांना सविस्तर माहिती सांगा. तुमचा मोबाईल नंबर, नाव सांगा. तिकिटाचा पीएनआर नंबर लक्षात असेल तर तो सांगा.

4 . सर्व माहिती सांगितल्यानंतर टीटीई त्यांच्याकडून माहिती तपासून तुम्हाला डय़ुप्लिकेट तिकीट बनवून देईल. यासाठी तुम्हाला काही छोटी रक्कम मोजावी लागेल.

5 . स्लिपर किंवा सेकंड क्लासव्यतिरिक्त इतर कोणत्याही डब्यातून प्रवास करत असाल तर चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या राखीव सीटवरून तुम्ही बिनधास्त प्रवास करू शकता.