बॉस असावा तर असा, 40 कर्मचाऱयांना दिला 70 कोटींचा बोनस

चांगल्या कामाचा मोबदला म्हणून कंपनीकडून कर्मचाऱयांना बोनस दिला जातो. फारफार तर एखादा पगार किंवा एखादी आकर्षक भेटवस्तू बोनस म्हणून कंपनीकडून दिली जाते. मात्र, एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना दिलेल्या बोनसची सर्वत्र चर्चा आहे. हेनान माइन या कंपनीने आपल्या 40
कर्मचाऱयांना तब्बल 70 कोटींचा बंपर बोनस
दिला आहे. तीन सर्वेत्तम कामगिरी करणाऱया सेल्स मॅनेजर्सना प्रत्येकी 6 कोटी रुपये तर 30 हून अधिक कर्मचाऱयांना प्रत्येकी सुमारे 1 कोटी 20
लाखांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात पहिल्या क्रमांकाची रक्कम इतकी जड होती की ती उचलून नेण्यासाङ्गी एका ग्रुपला स्टेजवर यावे लागले. दरम्यान या बंपर बोनसवर बॉस असावा तर असा…अशा प्रतिक्रिया नेटिझन्सने दिल्या आहेत.

2002 मध्ये स्थापन झालेल्या हेनान माइनमध्ये 5,100 हून अधिक कर्मचारी आहेत. 2022 मध्ये कंपनीने 9. 16 अब्ज युआन विक्री महसूल नोंदविला आहे. 2021 च्या तुलनेत ही 23 टक्क्यांची वाढ आहे.