शेतकऱ्यांचे कमी फॅटचे दूध आता ‘भाव’ खाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दूध संघांच्या मनमानी कारभारामुळे आतापर्यंत कवडीमोल दराने विकावे लागणारे शेतकऱ्यांचे कमी फॅटचे दूध आता चांगलाच भाव खाणार आहे. गुणप्रतीनुसार ३.५ पेक्षा कमी फॅट आणि ८.५ पेक्षा कमी एसएनएफ असलेले दूध आता दूध संघांना किमान २६ रुपये १० पैसे प्रतिलिटर दराने खरेदी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

…अन्यथा दूध संघांवर कारवाई करणार!

सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांचे कमी गुण प्रतीचे दूध खरेदी करणे सरकारी डेअरीबरोबरच खासगी आणि सहकारी डेअऱ्यांना बंधनकारक केले आहे. त्याचे पालन न केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार केली तर संबंधित दूध संघांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे दुग्ध विकास आयुक्त आर. आर. जाधव यांनी सांगितले.