
अनेकांच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होण्याची सततची तक्रार असते.
यामुळे थकवा, अशक्तपणा येतो. ऑनिमिया असे याला म्हणतात.
यावर उपाय म्हणजे, दररोज आवळ्याचे सेवन करावे.
स्वयंपाकात लोखंडी कढई तसेच तव्याचा वापर आवर्जून करावा.
चहा आणि कॉफीचे सेवन कमी करावे.
आहारात बीट, पालक यासह हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
तसेच डाळिंब, गूळ-शेंगदाणे या पदार्थांचा समावेश करावा.
नियमित व्यायाम करावा.
यामुळे आहारातील लोह शोषून घेण्यास मदत होते.



























































