
आयआयटीतज्ञांनी धोकादायक ठरवल्याने तीन वर्षांपूर्वी तोडलेल्या लोअर परळच्या उड्डाणपुलाचा दुसरा आणि शेवटचा गर्डर बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांनी विक्रमी वेळेत पार पाडले आहे. दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या या पुलाचा पुनर्विकास रखडल्याने मोठय़ा वाहतूककाsंडीचा सामना करावा लागत असून येत्या एप्रिल 2023 पर्यंत या पुलावरून वाहतूक सुरू करण्याची योजना पालिकेने आखली आहे.
पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ पुलाचा गर्डर बसविण्यासाठी गेले चार दिवस सलग ब्लॉक घेऊन काम सुरू होते. सतत पाऊस सुरू असतानाही पश्चिम रेल्वेच्या कन्स्ट्रक्शन विभागाने दुसरा गर्डर बसविण्याचे काम तीन महिन्यांच्या रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण केले आहे. या पुलाचे गर्डर ओपन वेब डिझाईनचे असून पहिला गर्डर 22 जून रोजी बसवला होता. हा गर्डर पश्चिम रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात जास्त लांबीचा (90 मीटर) व सिंगल स्पॅनसह 65 डिग्री तिरपा आणि 1045 टन वजन असलेला आहे.
हेवी डय़ुटी जॅकचा वापर
हा गर्डर तब्बल 1040 मेट्रिक टन वजनाचा असल्याने त्याला व्रेनने लिफ्ट करीत उचलून ट्रकवर बसविणे शक्य नव्हते. पश्चिम रेल्वेने सिंक्रोनाइज्ड डिस्पलेसमेंट पंट्रोल्ड स्ट्रड जॅक तंत्राचा प्रथमच वापर करीत हा महाकाय गर्डर लाँच केला. त्यासाठी हेवी डय़ुटी जॅकचा वापर करून या गर्डरला दर रात्री ब्लॉक घेत काही मीटर पुढे सरकवत बसविण्यात आले आहे. दर तासाला अवघ्या दहा मीटर या वेगाने हे काम करण्यात आले.
कोरोनाने काम रखडवले…
आयआयटीतज्ञ्जांच्या सुरक्षा ऑडिटमध्ये धोकादायक ठरल्याने डिलाईल पुलाला फेब्रुवारी 2019 मध्ये तोडण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईत एल्फिन्स्टन रोड पुलाजवळ प्रचंड वाहतूककाsंडी निर्माण होत आहे. या पुलाचे काम कोरोना संकटामुळे ऑक्सिजन सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने रखडले होते.
शहराची पूर्व–पश्चिम लिंक
हा पूल 89.89 मीटर लांबीचा असून 11 मीटरच्या तीन लेन आणि 1.8 मीटरचा फुटपाथ असा हा ब्रिटिशकालीन शंभर वर्षे जुना पुल असून तो 65 डिग्री तिरपा असल्याने हे काम करणे किचकट होते. हा उड्डाणपूल मोटारचालकांसाठी शहरातील पूर्व-पश्चिम लिंक असून लोअर परळ स्थानकाच्या पूर्वेकडून पश्चिमेला जाणारे पादचारीही याच पुलाचा वापर करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मार्चपर्यंत पूल वाहतुकीसाठी सुरू होणार – पालिका
रेल्वेकडून लोअर परळ पुलासाठी आवश्यक असलेले दोन गर्डर टाकण्याचे काम शनिवारी मध्यरात्री पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील काम पालिका सुरू करणार आहे. या मुख्य पुलावरून वरळी, लोअर परळ आणि डिलाईल रोडच्या दिशेने तीन जोडरस्ते विभागले जाणार आहेत. यातील दोन जोडरस्त्याचे काम केवळ 15 टक्के शिल्लक असून लवकरच ते पूर्ण होणार आहे तर तिसऱया जोडरस्त्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या तीनही जोडरस्त्यांची कामे मुंबई महापालिकेकडून मार्चपर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती पालिकेचे मुख्य पूल अभियंता सतीश ठोसर यांनी दिली.
15 रेल्वे इंजिनीअर व 102 मजुरांचा ताफा
दुसऱया गर्डरच्या लाँचिंगचे काम 15 जून 2022 रोजी सुरू झाले. लोकल वाहतुकीस कोणतीही बाधा न आणता केवळ नाईट ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या पाच दिवसांत 15 रेल्वे इंजिनीअर आणि एजन्सीची एक टीम तसेच कन्सलटेंट इंजिनीयर्स यांच्या टीमच्या देखरेखीखाली 24 तास मोहीम राबवून 8 सुपरवायझर आणि 102 मजुरांच्या टीमने अवघड शिवधनुष्य पेलले.































































