लोअर परळच्या उड्डाणपुलाचे काम 2022ला पूर्ण होणार

लोअर परळ (रेल्वे स्थानकाला जोडून असलेला) उड्डाणपूल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. याबाबत पश्चिम रेल्वेने खुलासा केला असून रेल्वे हद्दीतील पुलाचे काम मार्च 2021 पर्यंत आणि त्यानंतर पालिका हद्दीतील काम पूर्ण होण्यासाठी वर्ष लागेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) आणि अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे, पालिका व आयआयटीने रेल्वे हद्दीतील पादचारी पूल व उड्डाणपुलांचे सुरक्षा ऑडिट केले होते. यात लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जुलै 2018 मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी, परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

आपली प्रतिक्रिया द्या