
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांतील (एनबीएफसी) आघाडीची कंपनी असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेड (एलटीएफएच) ने डिजीटल तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाची ग्राहकांभिमुख रिटेल एनबीएफसी कंपनी बनण्याच्या दिशेने दमदार प्रवास आणखी वेगाने सुरु केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने वितरित केलेल्या एकूण कर्जापैकी 75 टक्के कर्ज हे रिटेल पोर्टफोलिओ स्वरुपातील असून लक्ष्य 2026 मध्ये निर्धारित केलेल्या उद्दीष्टाच्या 80 टक्क्यांपैकी अधिक उद्दीष्ट कंपनीने गाठलेले आहे.
वित्तीय वर्ष 2023 मध्ये कंपनीने 42 हजार 65 कोटी रुपयांचे रिटेल कर्ज वितरित केले आहे. गतवर्षाशी तुलना करता त्यात 69 टक्के वाढ कंपनीने साध्य केली आहे. एकूण रिटेल कर्जाचे प्रमाण सध्या 61 हजार 53 कोटी रुपये असून 31 मार्च 2022 च्या तुलनेत त्यात 35 टक्के वाढ झाली आहे. संपुर्ण वर्षात घाऊक (होलसेल) कर्जात 54 टक्के कपात करत त्याचे प्रमाण 19 हजार 840 कोटी रुपयांवर आणले आहे.
कंपनीचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) 2022-23 या वित्तीय वर्षासाठी एक हजार 623 कोटी रुपये नोंदविला गेला असून त्यात वार्षिक 52 टक्के वाढ झाली आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या निव्वळ चौथ्या तिमाहीसाठी करोत्तर नफा गत चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढून 501 कोटी रुपयांवर गेला आहे.

























































