व्हिडीओ कॉल उचताना सावधान! हनी ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता; या राज्यात आल्या तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेटकऱ्यांनो सावधान… अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल उचलणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे एखाद्या अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल उचलण्याआधी खात्री करून घ्या. नाहीतर हनी ट्रॅपमध्ये तुम्ही फसू शकता. उत्तरप्रदेश आणि हरियाणात अशाप्रकारची गॅंग सक्रिय असून ब्लॅकमेलिंगची प्रकरणं वाढली आहेत.

एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करणारा अंकित या हनी ट्रॅपचा शिकार झाला आहे. गेल्या आठवड्यात त्याला एका अनोळखी नंबरवरून रात्री 11 वाजता व्हिडीओ कॉल आला. त्याने व्हिडीओ कॉल उचलल्यानंतर समोरून अचानक एका मुलीचे अश्लील फोटो समोर आले. नंतर मुलगी तिचे कपडे उतरवत होती त्याला काही समजलेच नाही. काहीवेळाने त्याने व्हिडीओ कॉल बंद केला.

दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज आणि त्यासोबत तो एक व्हिडीओ आला. त्यात अश्लिल व्हिडीओत तो दिसत होता. ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या मेसेजमध्ये गुगल पे च्या माध्यमातून पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिली होती. अंकितला काहीच समजत नव्हते. अचानक हे सगळे काय आहे आणि आता नेमके काय करायचे त्याला कळत नव्हते. एकीकडे अश्लिल फोटो वायरल होण्याची भिती आणि सोशल साईटवर अश्लील व्हिडीओ पाहत असल्याने समाज काय विचार करेल याची भीती. मात्र हा केवळ अंकितचाच प्रश्न नव्हता तर उत्तर प्रदेशातील सायबर युनिटला अशाप्रकारच्या अनेक तक्रारी सध्या मिळत आहेत.

याप्रकरणी एसएसपी त्रिवेणी सिंह सांगतात की, डीप टेक तंत्रज्ञानाच्या मदतीने अशाप्रकारचे फोटो, व्हिडीओ तयार केले जातात. ही पूर्ण राजस्थानच्या भरतपूरातील गॅंग आहे. जी मथुरा आणि हरियाणाच्या मेवात प्रांतात जास्त सक्रिय आहे. जिथे मुल-मुली ब्लॅकमेलिंगचे काम करतात. अनेकदा कॉल अटेंड करणाऱ्याने काही केलेलेही नसते तरी सिंथेंटिक व्हिडीओ किंवा फोटोने त्याचा अश्लिल व्हिडीओ फोटो बनवला जातो. याबाबत तरुणपिढी बदनामीला घाबरून तक्रार करायला धजावतात. लोकं पोलिसांकडे मदत मागायला येतात, मात्र तक्रार द्यायला घाबरतात. सायबर गुन्हेगार सहसा असे काहीही एकदम व्हायरल करत नाही, कारण व्हायरल केल्यावर ते स्वत: पकडले जाऊ शकतात. मात्र ते व्हायरल करणार नाहीत याची खात्रीही देता येत नाही. एखाद्याच्या बदनामीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीनं लोकं लाखो रुपये देत आहेत.