मच्छीमार नगरला कोळीवाड्याचा दर्जा, सीमांकनाचे काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोळीवाडय़ांचे सीमांकन करण्याचा निर्णय झाल्यानंतरही भाजप सरकारच्या काळात या कोळीवाडय़ांचे सीमांकन रखडले होते. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येताच कोळीवाडय़ांचे सीमांकन पुन्हा सुरू झाले आहे. कफपरेड येथील मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या मच्छीमार नगर वसाहतीत ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे या वसाहतीची नोंद शासनदरबारी ‘कोळीवाडा’ म्हणून होणार आहे.

मुंबईतील कोळीवाडय़ांचे सीमांकन करण्यास सुरुवात झाली. मात्र कफपरेड येथील कोळीवाडय़ाचे सीमांकन झाले नव्हते. याबाबत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पकार यांच्याशी सन 2012मध्ये चर्चा केली होती. त्यानंतर 2012च्या पाकसाळी अधिकेशनात यासंबंधी लककरात लककर कार्यकाही सुरू करण्याचे निर्देश अजित पकार यांनी दिले होते. पुढे तो किषय प्रलंबित राहिला. याबाबत तांडेल यांनी पाठपुरावा केला. नवीन सरकार आल्यानंतर अखेर सोमवारी 23 डिसेंबरपासूनच कोळीवाडय़ाच्या सीमांकनाला सुरुवात झाली. नगर भूमापन अधिकारी मंगेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीरक्षण भूमापन अधिकारी बी.डी. पाटील, एच.एल. अरोलकर, बी.क्ही. तोरस्कर यांनी हे सीमांकनाचे काम मच्छीमार नगरात सुरू केले.

कोळी बांधवांना मिळणार लाभ
कोळीवाडा म्हणून नोंद झाल्याने कोळी बांधवांना जागेचा मालकी हक्क मिळेल. तीन चटई क्षेत्र मिळाल्याने 33 फुटांपर्यंत उंच घरे बांधू शकतील. अन्य कोळीवाडय़ांना मिळणारे हे लाभ आता कफपरेड येथील कोळीवाडय़ालाही मिळणार आहेत. कफपरेडच्या मच्छीमार नगरात 5 हजारहून अधिक घरे असून 25 हजार रहिवाशी आहेत.