आंतरराष्‍ट्रीय विकलांग व्‍यक्‍ती दिनानिमित्त विशेष सक्षम ग्राहकांसाठी नवीन पॅकेजिंग ‘इटक्‍वल’ची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्‍ट्रीय विकलांग व्‍यक्‍ती दिनानिमित्त पश्चिम व दक्षिणेकडील मॅकडोनाल्‍ड्स इंडियाने घोषणा केली की, कंपनी विशेष सक्षम ग्राहकांसाठी डिझाइन केलेले नवीन पॅकेजिंग – इटक्‍वल सादर करणार आहे. या पुरोगामी व सर्वसमावेशक उपक्रमासह कंपनीने पुन्‍हा एकदा प्रत्‍येकासाठी स्‍वादिष्‍ट पदार्थांचा आस्‍वाद घेण्‍याचा आनंद देण्‍याचे ब्रॅण्‍ड वचन अधिक दृढ केले आहे. इटक्‍वल पॅक एनजीओसोबतच्‍या अनेक महिन्‍यांपासूनच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून विकसित करण्‍यात आले आहे. ही एनजीओ 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून विशेष-सक्षम समुदायाच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याप्रती कार्य करत आली आहे.

डिसेंबर महिन्‍याच्‍या मध्‍यापासून पश्चिम व दक्षिण भारतातील सर्व मॅकडोनाल्‍ड्स रेस्‍टॉरण्‍ट्समध्‍ये इटक्‍वल उपलब्‍ध असेल.

वेस्‍टलाईफ डेव्‍हलपमेंट लिमिटेड तिच्‍या पूर्णत: मालकीची उपकंपनी हार्डकॅसल रेस्‍टॉरण्‍ट्स प्रा. लि. अंतर्गत पश्चिम व दक्षिण भारतातील मॅकडोनाल्‍ड्स रेस्‍टॉरण्‍ट्सची मालक असण्‍यासोबत कार्यसंचालन पाहते.

इटक्‍वल का?

सध्‍याच्‍या पॅकेजिंगमध्‍ये ग्राहकांना स्‍वादिष्‍ट मॅकडोनाल्‍ड्स बर्गर्सचा आस्‍वाद घेण्‍यासाठी दोन्‍ही हातांचा उपयोग करण्‍याची गरज आहे, या विचारामध्‍ये बदल करण्‍याच्‍या उद्देशामधून नवीन पॅकेजिंग नाविन्‍यतेला चालना मिळाली. शरीराच्‍या वरील बाजूस अपंगत्‍व असलेल्‍या व्‍यक्‍तींना याप्रमाणे आस्‍वाद घेणे अवघड जाते. इटक्‍वल या आव्‍हानाचे निराकरण करते आणि प्रत्‍येकजण त्‍यांच्‍या आवडत्‍या बर्गर्सचा सुलभपणे आस्‍वाद घेऊ शकण्‍याची खात्री देते.

या पॅकेजिंगच्‍या आगामी सादरीकरणाबाबत बोलताना मॅकडोनाल्‍ड्स इंडियाच्‍या (पश्चिम व दक्षिण) विपणन व संप्रेषण विभागाचे संचालक अरविंद आरपी म्‍हणाले, ”प्रत्‍येकासाठी स्‍वादिष्‍ट पदार्थांचा आस्‍वाद घेण्‍याचे क्षण सुलभ करण्‍याचा आमचा नेहमीच प्रयत्‍न राहिला आहे. या इटक्‍वल पॅकेजिंगचे सादरीकरण सर्वसमावेशकता व सामाजिक जबाबदारीप्रती आमच्‍या कटिबद्धतेच्‍या दिशेने आणखी एक पाऊल आहे. आम्‍ही आशा करतो की, हे पॅकेजिंग आमच्‍या विशेष-सक्षम ग्राहकांसाठी मॅकडोनाल्‍ड्स अनुभव सुलभ व आनंददायी करेल.”

भारतातील डीडीबी मुद्रा ग्रुपचे नॅशनल क्रिएटिव्‍ह डायरेक्‍टर राहुल मॅथ्‍यू म्‍हणाले, ”समानता व सर्वसमावेशकता नेहमीच मोठ्या गोष्टींत पहावी असे नाही. इतर करू शकणा-या लहान-लहान गोष्‍टी करणे देखील महत्त्वाचे असते, जसे तुमच्‍या आवडत्‍या मॅकडोनाल्‍ड्स बर्गरचा आस्‍वाद घेणे. आणि हाच विचार इटक्‍वल उपक्रमामागील मूलभूत आधार आहे. सर्वांसाठी मॅकडोनाल्‍ड्स अनुभव कशाप्राकरे आनंददायी करता येऊ शकतो या विचारामधून हा उपक्रम उदयास आला आहे.”

पश्चिम व दक्षिणेकडील मॅकडोनाल्‍ड्स इंडियाच्‍या या आगामी पॅकेजिंग सादरीकरणाबाबत बोलताना मुंबईतील सेंटर फॉर डिसॅबिलिटी स्‍टडीज अॅण्‍ड अॅक्‍शन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्‍सच्‍या सहयोगी प्राध्‍यापिका डॉ. वैशाली कोल्‍हे म्‍हणाल्‍या, ”मॅकडोनाल्‍ड्स सारखा प्रतिष्ठित ब्रॅण्‍ड त्‍यांच्‍या रेस्‍टॉरण्‍ट्समधील सर्वसमावेशकता कायम राखण्‍यासाठी उपक्रम हाती घेत असल्‍याचे पाहून खूपच चांगले वाटत आहे. फूड उपलब्‍ध असणे ही प्रत्‍येक व्‍यक्‍तीसाठी, तसेच शरीराच्‍या वरील भागामध्‍ये विकलांग असलेल्‍या व्‍यक्‍तीसाठी किमान आवश्‍यकता आहे. यासारखे नाविन्‍यपूर्ण उपक्रम त्‍यांच्‍यासाठी फूड सेवन करणे सुलभ करू शकतात. यांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही या व्‍यक्‍तींना सुविधा देण्‍यासोबत त्‍यांचा फूडचा आस्‍वाद घेण्‍याचा अनुभव स्‍वतंत्र व आनंददायी देखील करत आहोत. मी नवीन इटक्‍वल पॅकमध्‍ये माझ्या आवडत्‍या मॅकडोनाल्‍ड्स बर्गरचा आस्‍वाद घेण्‍यास उत्‍सुक आहे.”

वेस्‍टलाईफ डेव्‍हलपमेंट कंपनी त्‍यांच्‍या रेस्‍टॉरण्‍ट्समध्‍ये सर्वसमावेशकतेला चालना देण्‍यासाठी निश्‍चित पावले उचलत आली आहे. कंपनीने शक्‍य त्‍या ठिकाणी रॅम्‍प्‍स स्‍थापित करत विशेष-सक्षम व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या अनेक रेस्‍टॉरण्‍ट्समध्‍ये प्रवेश करण्‍याची सुविधा करून दिली आहे आणि रेस्‍टरूम्‍स व्‍हीलचेअर अनुकूल बनवली आहे. इटक्‍वलचे सादरीकरण हे सर्वसमावेशकतेला चालना देण्‍यासाठी ब्रॅण्‍डने उचललेले आणखी एक पाऊल आहे.