माढामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पिकांचे झाले नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा तालुक्यात पावसाने गुरुवारपासून दमदार हजेरी लावली. काल ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुर्डुवाडी-माढा रस्ता ,कुर्डुवाडी- पंढरपूर रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. तर ज्या मंडलात पाऊस झाला त्या ठिकाणी शेतीतील उभ्या पिकांचे नुकसान झाले, रस्ते खचले तर काही रस्ते वाहून गेले. या पावसाने कुर्डुवाडी -टेंभुर्णी, कुर्डुवाडी -शेटफळ , पंढरपूर,माढा -कुर्डूवाडी माढा, बार्शी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्या ने प्रवाशांची गैरसोय झाली.

माढा तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस पडला असून टेंभुर्णी येथे 90 मिमी , रांजणी 81 मिमी , रोपळे 126 मिमी , निमगाव टे 83 मिमी तर मोडनिंब येथे 65 मिमी इतका नोंदवला गेला आहे. माढा तालुक्यातील पाच महसुली मंडळात शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने या मंडळातील अनेक गावांतील शेती,शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक रस्ते खचले तर काही रस्ते वाहून गेल्याची माहिती मिळते आहे या पावसाने कुर्डुवाडी -टेंभुर्णी, कुर्डुवाडी -शेटफळ , पंढरपूर, तसेच माढा -कुर्डूवाडी माढा -, बार्शी या मार्गावरील बेंद ओढा ओसंडून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

बादलेवाडी,ढवळे,दहिवली,कंदर,शेडशिंगे,जाखले,उपळवटे,चोभेपिंपरी,भोगेवाडी,रोपळे,कन्हेरगाव,नाडी,लोणी,मुंगशी,,सापटणे टे, निमगाव टे , पिंपळनेर या गावातील केळी,पेरु, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे तर या परिसरात नव्याने लागण झालेल्या उसाचे क्षेत्रात पाणी उभा राहिल्याने तेथे दुबार लागण करण्यात चे नवे संकट ओढवले आहे

पर्यायी रस्ता वाहुन गेल्याने वाहतूक ठप्प

माढा-कुर्डुवाडी रस्त्यावर भोसरे गावचे हद्दीतून बेंद ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे ही वाहतूक ठप्प झाली मुळात या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्यामुळे तेथे केलेला पर्यायी रस्ता देखील वाहुन गेल्याने ही वाहतूक बंद पडली त्यामुळे सकाळी वैराग, सोलापूर येथून कुर्डुवाडी कडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग वापरून करण्यात आली पावसाचचा जोर इतका होता की पाणी कुर्डुवाडी आगारात शिरल्याने एसटी बसेस जागेवरच अडकून राहिल्या ने तालुका अंतर्गत एस टी वाहतूक ठप्प झाली. जाखले आणि चोभेपिंपरी गावच्या शीवहद्दीवर असलेला पाझर तलाव फुटल्याने त्याखाली असलेल्या चोभेपिंपरी गावाच्या हद्दीतील अनेक विहिरी गाळाने बुजल्या