
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी ’नववर्षाची परफेक्ट सुरुवात’ असं म्हणत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुंबई परिसरातील बोटींगचे हे फोटो आहेत.
’समुद्र, वाऱयाची झुळुक आणि सूर्यास्त’ असं कॅप्शन माधुरीने फोटोला दिलं आहे. यात सफेद टी शर्ट मधील माधुरी कमालीची छान दिसत आहे. श्रीराम नेने यांनीदेखील त्यांच्या इंस्टा अकाऊंटवर आऊटिंगचा सेल्फी पोस्ट केला आहे. ’समुद्राची हवा शुद्ध आहे. आणि हा सूर्यास्त तर खूपच मोहक! मुंबईच्या सभोवती एवढं पाणी आहे, यावर विश्वास बसत नाहीय. निश्चितच हे पाणी आपण सांभाळलं पाहिजे. खूप हुशारीने त्याचा वापर केला पाहिजे, अशी पोस्ट श्रीराम नेने यांनी लिहिली आहे. त्याआधी बुधवारी माधुरीने आजच्या दिवसाचा विचार मांडताना घोडय़ांसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला होता. ’आयुष्य म्हणजे सोडवता येईल अशी समस्या नसून अनुभवण्याचे वास्तव आहे’, हा विचार शेअर केला होता.




























































