
वैष्णौदेवी मंदिरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी घडलेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशमध्ये भाविकांनी भरलेली बस नदीत कोसळली. या अपघातात 3 भाविकांचा मृत्यू झाला तर 28 भाविक जखमी झाले आहेत.
अलीराजपूर जिल्ह्यातील चांदपूर येथे हा अपघात झाला. हे भाविक गुजरातमधील छोटा उदयपूरवरून अलीराजपूर येथे येत होते. त्यावेळी चांदपूरमधील लखोदरा नदीत ही बस कोसळली. या अपघातात 3 भाविक जागीच ठार झाले. त्यानंतर पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी नदीत अडकलेल्या बसमधून जखमींना बाहेर काढले व त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.





























































