
जातीपातीच्या मुद्दय़ावरून होणारा भेदभाव आणि हिंसाचार धक्कादायक आणि चिंताजनक आहे. जातीविषयीचा हा हटवादीपणा कायम राहिल्यास पुढच्या शंभर ते दीडशे वर्षांत स्वतःला हिंदू म्हणवणाऱयांचे अस्तित्वच नष्ट होईल, अशी टिप्पणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आज केली. मध्य प्रदेशातील दामोह जिह्यात मागास समाजातील व्यक्तीला अपमानित केल्याच्या मुद्दय़ावर कोर्टाने हे मत मांडले.