कमलनाथांच्या भाच्याने रात्रीत उडवले 8 कोटी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणातील आरोपी रतुल पुरी याने अमेरिकेतील एका नाइट क्लबमध्ये एका रात्री 11 लाख डॉलर्स म्हणजेच 7.8 कोटी रुपये उडवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात पुरीसह त्याचे सहकारी आणि मोजर बेयर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचेही नाव आहे.

ईडीने रतुल पुरी याच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार रतुल पुरी परदेशातील अनेक हॉटेलांमध्ये थांबला होता. हे त्याने केलेल्या पैशांच्या व्यवहारांची पडताळणी करण्यात आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या दरम्यान अमेरिकेतील प्रोव्होकेटर नाकाच्या एका नाइट क्लबमध्ये एकाच रात्री 7.8 कोटी रुपये उडकल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय नोक्हेंबर 2011 आणि ऑक्टोबर 2016च्या दरम्यान पुरीने स्वतःच्या मौजमजेसाठी सुमारे 32 कोटी रुपये खर्च केल्याचे आढळून झाले आहे.

ईडीने दिल्लीच्या न्यायालयात एकूण 110 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात रतुल पुरीकर ‘ईडी’ने आठ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या मनी लॉण्डरिंगचा आरोप केला आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी मोजर बेअर इंडिया कंपन्यांच्या ‘जटिल रचनेचा’ कापर केल्याचा दाकाही ‘ईडी’ने केला आहे. पैसे कळकण्यासाठी ‘शेल कंपन्या’ स्थापन केल्याचेही ‘ईडी’ने म्हटलेय. पुरी यांच्याकर विविध सहायक कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेकण्यात आला आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातही रतुल पुरी आरोपी असून त्याला मनी लॉण्डरिंगप्रकरणी 20 ऑगस्टला अटक करण्यात आली होती तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

मनी लॉण्डरिंगसाठी बोगस कंपन्या

ईडीने आरोपपत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार पुरीने मनी लॉण्डरिंगमध्ये सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. मोजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आपल्या कंपन्यांकडे कळती केल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. या व्यवहारासाठी बनावट कंपन्या बनवल्या गेल्या. पैसे कळते करण्यात आलेल्या अशा 12 कंपन्यांच्या नाकांचा उल्लेख ईडीने आरोपपत्रात केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या