
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका रोजंदारी मजुरांना बसला असून राज्याराज्यांमधून अनेक मजूर आपापल्या गावी परत जात आहेत. या दरम्यान त्यांना होणाऱ्या अपघातांचं सत्र सुरूच असून संभाजीनगर नंतर आता मध्य प्रदेशमध्ये मजूर अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.
मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमधील पाठा गावनजीक मजुरांना घेऊन जाणारा ट्रक पलटल्याने झालेल्या अपघातात 5 मजूर मृत्युमुखी पडले आहेत. तर 11 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण हैदराबादहून उत्तर प्रदेशच्या दिशेने प्रवास करत होते. हा अपघात झाला तेव्हा चालकासह 18 जण या ट्रकमध्ये होते. वाटेत पाठागाव नजीक ट्रक पलटून भीषण अपघात झाला. यात पाच जण जागीच ठार झाले.
Madhya Pradesh: 5 labourers died, 11 injured after the truck they were in, overturned near Patha village in Narsinghpur. The labourers were going from Telangana’s Hyderabad to Uttar Pradesh in the truck, which was also carrying mangoes. More details awaited. pic.twitter.com/bowYPVMn1P
— ANI (@ANI) May 9, 2020
जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तसंच दोन मजुरांना जबलपूर येथे हलवण्यात आलं आहे. यातील काही जखमींना सर्दी खोकल्याची लक्षणं दिसत असल्यामुळे मृतांसहित जखमींचे कोरोना स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.




























































