Video – 1000 रुपयांपर्यंत लाच घेणे अयोग्य नाही, बसपा महिला आमदाराचे मत

बेरोजगारी, महागाईच्या संकटात होरपळणाऱ्या सामान्य माणसाला भ्रष्टाचाराचाही सामना करावा लागत आहे. यावरच आपलं मत व्यक्त करताना मध्य प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) आमदार राम बाई सिंह म्हणल्या की, जर कोणी 1000 रुपयांपर्यंत लाच घेत असेल तर त्यात काहीच चुकीच नाही. मात्र त्यापेक्षा जास्त लाच घेणे चुकीच आहे’, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात सातुआ गावातील काही लोकांनी अधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी आमदार राम बाई सिंह यांची भेट घेतली. पीएम आवास योजनेच्या नावावर सहाय्यक सचिव हे 5 ते 10 हजार रुपयांची लाच घेत असल्याचा आरोप या लोकांनी केला आहे. आमदाराने गावात घेतलेल्या चौपालदरम्यान ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोरच त्यांची तक्रार राम बाई सिंह यांच्याकडे केली आहे.

यावरच बोलताना राम बाई सिंह म्हणाल्या, ‘थोडे फार चालते, मात्र हजारो रुपये कोणत्याही गरीब व्यक्तीकडून घेतले जाऊ नयेत. एक हजार रुपये घेतले तरी काही हरकत नव्हती, पण 1.25 लाखांच्या घरासाठी 5-10 हजारांची लाच घेणे चुकीचे आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या