डंपर आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात सोमवारी सकाळी डंपर आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू झाला, आणि 5 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 3 महिलांचा आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहिती, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुरेंद्र कुमार जैन यांनी दिली.

सर्व मृत रिवा येथील रहिवासी होते. पन्ना येथे एका शोक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्व गेले होते. घराकडे परत येत असताना एका वेगवान डंपरने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. यात 6 जण जागीच ठार झाले, तर एकाने रुग्णालयात दम तोडला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथून त्यांना रिवाच्या मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आले आहे. वाहनात जवळपास 12 जण प्रवासी होते, असेही पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे ट्विट

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातावर दुःख व्यक्त केले असून जखमींची लवकर बरे होण्याची कामना केली आहे.