बर्फाची आंघोळ करून ‘शिवाम्बु’ पिते ‘ही’ प्रसिद्ध सेलिब्रिटी

1939

जगात विविध प्रकारच्या उपचार पद्धती अस्तित्वात आहेत. अॅलोपथी, होमिओपथी किंवा आयुर्वेदिक यांपेक्षाही वेगळ्या पद्धतींचा अवलंब या उपचार पद्धतींमध्ये केला जातो. अशाच प्रकारचा एक उपचार घेताना एका सेलिब्रिटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ही सेलिब्रिटी म्हणजे अमेरिकेची प्रसिद्ध गायिका मॅडोना आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती पहाटे तीन वाजता आईस बाथ म्हणजे बर्फाची आंघोळ करताना दिसत आहे. तिच्या व्हिडीओच्या कॅप्शनवरून ती एखादा उपचार घेत असावी, असं दिसून येत आहे. कारण तिने आईस बाथ हा दुखण्यावरचा सगळ्यात उत्तम इलाज असं म्हटलं आहे. आजतक या वृत्तवाहिनीने यासंंबधीचे वृत्त दिले आहे.

आईस बाथनंतर मॅडोन आपले मोजे काढते आणि त्यानंतर ती एका कपातून पिवळ्या रंगाचं पेय पिताना दिसते. हे पेयही त्या इलाजाचा हिस्सा असल्याचं दिसून येतं. कारण ती या व्हिडीओत म्हणते की, बर्फाळ पाण्यातून बाहेर आल्यानंतर यूरिन (मूत्र) पिणं खरंच खूप चांगलं आहे. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या