
सामना प्रतिनिधी । कुडाळ
शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी कुडाळ मधील श्री देव भैरव व श्री देव मारूती मंदीरात महाआरती करण्यात आली. दरम्यान शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, महीला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. जान्हवी सावंत, आघाडी जिल्हा प्रमुख सौ. जान्हवी सावंत, संजय भोगटे, बबन बोभाटे, जयभारत पालव, डॉ. सुबोध माधव, सौ मधुरा राऊळ, सौ. अनघा तेंडोलकर, बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, सौ. प्रज्ञा राणे, सौ. श्रेया गवंडे, सौ. मेघा सुकी, तृप्ती सावंत, कन्याश्री मेस्त्री, नागेश नाईक, दिपक आंगणे नरेंद्र राणे, संतोष शिरसाट, तानाजी पालव, जीवन बांदेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. दरम्यानच्यावेळी शिवसैनिक रॅलीने ‘जय श्रीराम ’ अशी घोषणा देत मंदीरात पोहोचले त्यांनतर महाआरती करण्यात आली.




























































