महापुरामुळे महाड-चिपळूणमधील उद्योगांचे अडीच हजार कोटींचे नुकसान, एमआयडीसीचा प्राथमिक अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे महाड, चिपळूण येथील औद्योगिक वसाहतींतील उद्योगांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) वर्तवला आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानुसार एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी केलेल्या पाहणीनंतर हा अंदाज काढण्यात आला.

महाड एमआयडीसीला फटका

एएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी महाड व नवीन महाड औद्योगिक वसाहतीला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. महाड व नवीन महाड एमआयडीसी परिसरात सुमारे दोन हजार एकरवर पसरलेल्या औद्योगिक वसाहतीला पुराचा मोठा फटका बसला. या ठिकाणी दोन ते सवा दोन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अनेक उद्योगांची दालने पाण्याखाली गेल्याने मशीन, साहित्य व मालाचे नुकसान झाले. काही ठिकाणी तयार कच्चा पक्का माल वाहून गेला.

अतिवृष्टीमुळे महाड, चिपळूणसह कोकणातील उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. लवकरच सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले जातील. ज्यांनी विम्याचे संरक्षण घेतले आहे, त्यांना विमा पंपन्यांनी कागदपत्रांची मागणी न करता भरपाई द्यावी. अशा संकटात राज्य सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शक्य तितकी मदत करण्यात येईल.
– सुभाष देसाई, उद्योग मंत्री

चिपळूणमधील 50 उद्योगांचे नुकसान

– पी. डी. मलिकनेर यांनी चिपळूण औद्योगिक वसाहतीतील नुकसानीचा आढावा घेतला. येथील 161 उद्योगांपैकी 50 उद्योगांचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. पाणी पुरवठय़ावरदेखील परिणाम झाला. काही ठिकाणी पाणी पुरवठा योजना बंद पडल्या. एमआयडीसी कार्यालयांत पाणी भरल्याने काही कागदपत्रेदेखील भिजली आहेत. अनेक ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे एक दोन दिवसांत पूर्ण होतील.

कागदपत्रे भिजल्याने अडचण

z काही उद्योगांनी विमा कवच घेतले होते परंतु विमा पंपन्याकडून उद्योजकांना कागदपत्रांची मागणी केली जात आहे. परंतु कागदपत्रे भिजल्याने ते देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विमा पंपन्यांकडून भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी उद्योजकांनी केल्या आहेत.

एमआयडीसीच्या फाईल भिजल्या

z महापुराचा फटका एमआयडीसीच्या कार्यालयांनादेखील बसला आहे. येथील अभियांत्रिकी विभागाचे कार्यालय पाण्याखाली गेले होते. त्यात अनेक फाइल भिजल्या आहेत. त्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कार्यालयीन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.