
सीएसएमटी स्थानकाला लागून असलेला ‘हिमालय’ पूल तोडल्यानंतर रेल्वेने पादचारी पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महालक्ष्मी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 यांना जोडलेल्या उत्तर दिशेच्या जुन्या पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेकडील पायऱया दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. 3 नोव्हेंबर ते 2 जानेवारी 2020 असे दोन महिने हे काम चालणार असल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. प्रवाशांनी या पादचारी पुलाच्या उत्तर दिशेकडे असलेल्या पायऱयांचा तसेच इतर पादचारी पुलांचा दरम्यानच्या काळात वापर करावा असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

























































