महानंदच्या दुधाची ताकद सीमेवरच्या जवानांना मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महानंदच्या दुधाची ताकद पुन्हा सीमेवरील जवानांना मिळणार आहे. नॉर्दन कमांडअंतर्गत असलेल्या उरी, रामपूर, नारिया आणि राजौरी या तीन डेपोंना वर्षभरात तब्बल 21 लाख 40 हजार लिटर टेट्रापॅकिंगचे दूध पुरवण्याबाबत डेअरीने लष्करासोबत करार केला आहे.

लष्कराच्या नॉर्दन कमांडने मागील वर्षी महाराष्ट्रातील दुधाला वास येत असल्याचे कारण देत महानंद आणि वारणा डेअरीकडून टेट्रापॅकिंगचे दूध घेण्यास नकार दिला होता. मात्र यंदा महानंदने तब्बल 21 लाख 40 हजार लिटर टेट्रापॅकिंगचे दूध नॉर्दन कमांडला पुरवण्याबाबत टेंडर मिळवले असून त्याबाबतचा करार नुकताच केला आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वर्षभर दुधाचा पुरवठा केला जाणार आहे.