
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीला जनतेने कौल दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, तर काही ठिकाणी अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.
#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्या पेटीपासून सुरू झालेली रंगत अखेरची पेटी फूटेपर्यंतही दिसून आली. कधी महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड, तर कधी आघाडीच्या उमेदवाराचे पारडे जड असे दिसून आले. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत नक्की कोण विजयी होणार याबाबत अंदाज वर्तवने कठिण होते. अखेर सायंकाळपर्यंत निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाच मतदारसंघात चूरशीच्या लढती झाल्या. या मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी निसटचा विजय मिळवला.
पाहूया कोणते आहेत हे मतदारसंघ –
> अर्जुनी-मोरगांव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवर्धन चंद्रीकापुरे 718 मतांनी विजयी
> चांदिवली मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार दीलिप लांडे 409 मतांनी विजयी
> दौड मतदारसंघात भाजपचे राहुल कूल हे 746 मतांनी विजयी.
> कोपरगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे 822 मतांनी विजयी.
> सांगोला मतदारसंघात शिवसेनेचे अॅड. शहाजीबापू पाटील यांचा 768 मतांनी विजय.



























































