पहिल्याच दिवशी तेरा लाख विद्यार्थ्यांची हजेरी, पाचवी ते आठवीच्या 85 टक्के शाळा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 27 जानेवारीला पहिल्याच दिवशी तब्बल 12 लाख 47 हजार 745 विद्यार्थ्यांची हजेरी लागली. तर राज्यातल्या 34 हजार 996 म्हणजेच 85.75 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 714 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

जिह्याजिह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाला दिल्या होत्या त्यानुसार 27 जानेवारीपासून कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेऊन राज्यातील काही जिह्यांतील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी आतापर्यंत 1 लाख 22 हजार 668 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 552 शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 23 हजार 559 शिक्षकेतर कर्मचाऱयांपैकी 162 जण पॉझिटिव्ह आहेत.

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय उपस्थिती
– नगर 88,456, जालना 45, 012
-पुणे 66,018, गडचिरोली 38,122
– यवतमाळ 65,685, अकोला 36,357
– पालघर 64,662, सातारा 36,348
– नांदेड 63,638, गोंदीया 35,544
– अमरावती 56,740 धुळे 30,534
– संभाजीनगर 55,939, भंडारा 30,501
– चंद्रपूर 54,954 नागपूर 33,919
– वर्धा 29,704
– सिंधुदुर्ग 14,197
– ठाणे 10,320

– नाशिक जिह्यात विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती होती. या जिह्यात 2 हजार 34 शाळांमधून 1 लाख 12 हजार 226 विद्यार्थी हजर होते.
– यवतमाळ जिह्यात सर्वाधिक 83 शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत. नागपूर 65, नांदेड 41, अमरावती 35 शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत.