राज्यातील रस्त्यांसाठी एशियन बँकेकडून 15 हजार कोटींचे अर्थसहाय्य

183

नवी दिल्ली ः दळणवळणाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून 15 हजार कोटी निधीचे अर्थसहाय्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून मिळणाऱया निधीमधून राज्यातील रस्ते विकासाची अनेक कामे हाती घेतली जातील. यासाठी राज्यातील रस्ते विकासाचा निश्चित कार्यक्रम ठरवून अधिक रहदारी असणाऱया रस्त्यांचा विकास प्राथमिकतेने करण्यात येईल. राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे तसेच अधिक रहदारीच्या रस्त्यांना चिन्हीत केले जाईल. यामध्ये राज्यातील महामार्ग, इतर राज्यांना जोडणारे महामार्ग, जिह्यांना, तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणारे रस्ते, तीर्थस्थळांना जोडणाऱया रस्त्यांचा समावेश असणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या