नोटा झाला मोठा, लातूर ग्रामीणमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला

942
फोटो प्रातिनिधिक

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांचा विजय झाला आहे. मात्र या मतदारसंघात एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे इथे दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला मिळाली आहे. धीरज देशमुख यांना 86927 मते मिळाली आहेत तर 20113 मतदारांनी नोटाचे बटन दाबले.

लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक लढवत असल्याने इथली लढत राज्यातील रंजक लढतींपैकी एक मानली जात होती. ही जागा देशमुख कुटुंबासाठी प्रतिष्ठेची बनली होती. लातूर ग्रामीण हा लातूर तालुक्यातील मतदारसंघ असून 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तो तयार झालेला आहे. काँग्रेस नेते शिवराज पाटील आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं लातूर जिल्ह्यातील राजकारणावर सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. हे वर्चस्व कायम रहावे यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघातून देशमुख कुटुंबातील धीरज यांना उमेदवारी देण्यात आली होती. धीरज देशमुख हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्र्यंबक भिसे यांनी भाजपच्या रमेश कराड यांना कडवी झुंज देत काँग्रेसकडे हा मतदारसंघ खेचला होता. काँग्रेस हा मतदारसंघ राखण्यात यशस्वी होतो का याकडे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या