दोन्ही हात नसलेल्या मतदाराचा राष्ट्रीय ‘कर्तव्य’ बजावतानाचा फोटो व्हायरल

2611

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्याने मतदारांनी घरातून बाहेर पडत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. ठिकठिकाणी महिला, पुरूष, तरुण, तरुणी, वयोवृद्ध मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. याच दरम्यान नाशिकमधील एका मतदाराचा कौतुक वाटावा असा फोटो व्हायरल होत आहे.

Live- राज्यात 2 वाजेपर्यंत सरासरी 30.63 टक्के मतदान

नाशिकमध्ये दोन्ही हात नसल्याने शेतकऱ्याने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. देवळाली कॅम्पमधील शेतकऱ्याच्या दोन्ही हात नसल्याने पायाला शाई लावण्यात आले. त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोतील शेतकऱ्याचे नाव बाजीराव मोजाड असे आहे. 2008 साली शेतात राबताना एका अपघातात त्यांनी दोन्ही हात गमावले होते.

#विधानसभा2019 खेळाडूंपासून ते अभिनेत्यांपर्यंत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

आपली प्रतिक्रिया द्या