4 हजार 739 उमेदवार छाननीच्या परीक्षेत ‘पास’

5380

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 5543 पैकी 4739 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. राज्यभरातील सर्व विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची रविवारी छाननी करण्यात आली. यादरम्यान अर्जात त्रुटी आढळल्यामुळे 798 जण निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची रविवारी छाननी करण्यात आली. यात नंदुरबार जिह्यातील 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. वाशिम जिह्यात 3 मतदारसंघात 60 उमेदवार, अमरावती जिह्यात 8 मतदारसंघात 151 उमेदवार, वर्धा जिह्यात 4 मतदारसंघात 59 उमेदवार, नागपूर जिह्यात 12 मतदारसंघात 181 उमेदवार, भंडारा जिह्यात 3 मतदारसंघात 66 उमेदवार, गोंदीया जिह्यात 4 मतदारसंघात 71 उमेदवार, गडचिरोली जिह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, चंद्रपूर जिह्यात 6 मतदारसंघात 90 उमेदवार, यवतमाळ जिह्यात 7 मतदारसंघात 125 उमेदवार, नांदेड जिह्यात 9 मतदारसंघात 327 उमेदवार, हिंगोली जिह्यात 3 मतदारसंघात 54 उमेदवार, नाशिक जिह्यात 15 मतदारसंघात 212 उमेदवार, रत्नागिरी जिह्यात 5 मतदारसंघात 40 उमेदवार, सिंधुदूर्ग जिह्यात 3 मतदारसंघात 27 उमेदवार, कोल्हापूर जिह्यात 10 मतदारसंघात 186 उमेदवार.

मुंबई-ठाण्यात 607 अर्ज वैध

मुंबई उपनगर जिह्यात 25 मतदारसंघात 272 उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिह्यात 10 मतदारसंघात 84 उमेदवार, ठाणे जिह्यात 18 मतदारसंघात 251 उमेदवार, रायगड जिह्यात 7 मतदारसंघात 112 उमेदवार तसेच पालघर जिह्यातील 6 मतदारसंघात 69 उमेदवारांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या