
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांची सोशल मीडियावर बोंब सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱया तारखा या अफवा असून यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर दहावीचा निकाल ६ जून, ८ जून, ११ जून या तारखांना लागेल असे मेसेज फिरत आहेत. निकालाची तारीख निश्चित होताच प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देण्यात येईल, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.






















































