सूर्य आग ओकतोय, 45 अंशांच्या पार गेलाय महाराष्ट्रातील या दोन शहरांचा पारा

2298

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना आता सुर्याने देखील आग ओकायला सुरुवात केली आहे. देशातील काही शहरांचा पारा 46 अंशांच्या पार गेला आहे. महाराष्ट्रातील दोन शहरांमध्येही तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर या दोन शहरातील तापमान 45.6 डिग्री नोंदवले गेले आहे. देशातील सर्वात जास्त उष्ण शहरांच्या यादीत या दोन शहरांचा समावेश आहे. देशात सर्वाधिक तापमान हे राजस्थानमधील चुरू व श्रीगंगानगर या शहरांत नोंदवले गेले आहे. या दोन्ही शहरांत तापमानाचा पारा 46.6 डिग्री सेल्सियसवर पोहोचला आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमधील झांशी, राजस्थामधील पिलानी, बिकानेर, कोटा, मध्य प्रदेशमधील नौगाव, महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, मध्य प्रदेशातील खजुराहो, या शहरांचा समावेश आहे.

पुढील पाच दिवसात तापमान वाढणार
पुढिल पाच दिवसात राजस्थान, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधील तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हा पारा 48 ते 49 डिग्रीपर्यंत पोहचू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या