महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाईविरोधात काँग्रेकडून मुंबईसह राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले. मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृह ते चैत्यभूमी असा लाँगमार्च काढून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम येथून पदयात्रा काढून केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भडकलेल्या महागाईबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाई जगताप म्हणाले, ‘महागाई, वाढत्या बेरोजगारीविरोधातील हे शक्तिप्रदर्शन आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या पुठे आहेत,’ असा सवाल त्यांनी केला.

झिशान सिद्दीकी, भाई जगताप यांच्यात वाद

काँग्रेसमधील अंतर्गत वाद मुंबईतील आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आल्याचे म्हटले जात आहे. या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली मात्र ट्रकवर चढण्यावरुन भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यात वाद झाला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर म्हणजेच राजगृहावर जाण्यावरुनदेखील नाराजीनाटय़ रंगले. याबाबत भाई जगताप म्हणाले. ‘बाबासाहेबांच्या घरी जाण्यासाठी लिस्ट पाठवली होती. त्यात दहा जणांचा समावेश होता. त्यात झिशानला तुमचं नाव नाही हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण ठरवणारा मी नव्हतो. बाबासाहेबांच्या घरातील मंडळीने ही नावं फायनल केली होती. नाव नसल्याने त्याला वाईट वाटलं.’ तर झिशान सिद्दीकी म्हणाले, ‘कोणताही वाद झाला नाही. सर्व एकसाथ आहोत. माझा आणि सुरज ठापुरचाही वाद झाला नाही. भाई जगताप म्हणतात राजगृहामध्ये 10 व्यक्तींनाच परवानगी होती. मी मुंबई युवक का@ंग्रेसचा अध्यक्ष, आमदार असूनही माझे नाव नव्हते. कदाचित त्यांना ते महत्वाचे वाटत नसावे. आमचे, माझ्या वडिलांचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुने संबध आहेत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले पण 10 लोकांनाच परवानगी होती, हे त्यांनी नाकारलंय़.

डिसेंबरमध्ये राहुल गांधी मुंबई दौऱयावर

केंद्र सरकार, महागाई, बेरोजगारीविरोधात हे शक्तिप्रदर्शन आहे. आज याची सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यात राहुल गांधी शिवाजी पार्पवर जाहीर सभा घेऊन मोदी सरकारच्या नीतीविरोधात बोलणार आहेत. त्याची साक्षीदार महाराष्ट्र आणि मुंबईची जनता राहणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.