
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आजही कायम राहिली असून एका दिवसात नवीन 419 रुग्णांची नोंद झाली. यामुळेच मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 3451 वर पोहोचली आहे. धारावीतही आज 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या ठिकाणी एकूण संख्या 180 पोहोचली. राज्य सरकारच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली असून राज्यात आज एकूण 552 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5218 वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.























































