
शुक्रवारी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 52 होती; परंतु शनिवारी ती 64 वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात 12 रुग्ण वाढले असून त्यात मुंबईचे 8 तर पुण्यातील दोन आणि यवतमाळ, कल्याणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
मुंबईच्या 8 रुग्णांपैकी 6 जण हे परदेश दौऱयावरून आले आहेत तर उर्वरित 2 जणांना कोरोनाची बाधा संसर्गातून झाली आहे. त्यातील एकजण विमानतळावरील कर्मचारी असून दुसरा रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 5 आणि सैफी, नानावटी आणि रिलायन्स रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू असून पुण्यातील नायडू रुग्णालयात दोन रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोनाचे संकट अधिकच गहिरे होत असून महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱया टप्प्यात आहे. परिस्थिती अशी कायम राहिल्यास चिंता वाढू शकते असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
देशातील रुग्ण – 299
केरळमध्ये दिवसभरात 12 नवीन रुग्ण आढळले

























































