राज्यात दिवसभरात 6,365 जण कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश येत असून राज्यात आज दिवसभरात 6 हजार 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 93.42 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर 4 हजार 26 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

कोरोना पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी अनेक मोहिमांबरोबरच विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 50 जणांचा मृत्यू झाला, तर मृत्यूदर 2.57 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 13 लाख 77 हजार 74 चाचण्या झाल्या असून 18 लाख 59 हजार 367 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 5 लाख 48 हजार 961 जण होम कोरंटाईन तर 5 हजार 617 जण संस्थात्मक कोरंटाईन आहेत.