राज्यात 17 हजार 794 नवीन रुग्ण

राज्यात दिवसभरात 19 हजार 592 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून 17 हजार 794 नवीन रुग्णांचे निदान झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 92 हजार 806 वर पोहोचली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.33 टक्के एवढे झाले आहे. सध्या 2 लाख 72 हजार 775 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 416 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची शुक्रवारी नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठिण्यात आलेल्या 62 लाख 80 हजार 788 नमुन्यांपैकी 13 लाख 757 नमुने पॉझिटिव्ह (20.71 टक्के) आले आहेत. राज्यात 19 लाख 29 हजार 572 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 32 हजार 747 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात 1,876 कोरोना रुग्ण, 1,169 कोरोनामुक्त,

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 1,876 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 1,169 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 1 लाख 56,806 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत 48 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 703 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 63 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 28 हजार 273 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 10 लाख 57 हजार 640 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 94,177 वर पोहोचली आहे.

उच्चांक! देशात दिवसभरात 15 लाख कोरोना चाचण्या

देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासांत 14 लाख 92 हजार 409 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंतची ही विक्रमी आकडेवारी आहे. देशात आतापर्यंत सुमारे सात कोटी चाचण्या झाल्या आहेत. देशाचा एकंदर पॉझिटिव्हिटी रेट 8.44 टक्के असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशातील कोरोनाविरोधातील लढाई ऐतिहासीक शिखरावर आहे. त्यातून पहिल्यांदाच 15 लाखांच्या आसपास चाचण्या एका दिवसात पार पडल्या आहेत. आतापर्यंत देशात एकूण चाचण्या सहा कोटी 89 लाख 28 हजार 440 झाल्या आहेत. टेस्टींग सुविधा वाढवण्यासह राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण वाढल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली. 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 49 हजार 948 चाचण्या होत आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. विशेषत: ज्या राज्यांमध्ये चाचण्या जास्त होत आहेत, तिथे चांगले परिणाम दिसत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या