
साई श्री हॉस्पिटल औंध पुणे येथे सुप्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांच्या नेतृत्वात पश्चिम हिंदुस्थानातील पहिल्याच क्यूविस जॉईंट रोबोटिक सिस्टीमची स्थापना करण्यात आली आहे.
साईश्री हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी हे नवीन तंत्रज्ञान वापरून पुण्यात पहिल्यांदा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केली. 65 वर्षांच्या लीला देशमुख यांना उजव्या गुडघ्यात प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा सल्ला देण्यात आला. साईश्री हॉस्पिटल मधील डॉ. नीरज आडकर आणि त्यांच्या टीमने त्यांच्यावर क्यूविस जॉईंट रोबोटिक सर्जरी केली. लीला यांच्या डाव्या गुडघ्याची काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. क्यूविस जॉईंट रोबोटिक तंत्रज्ञान वापरून शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांच्या उजव्या व डाव्या गुडघ्यातील शस्त्रक्रियेमध्ये कमालीचा बदल दिसून आला. या शस्त्रक्रियेच्या 4 तासातच त्या कोणत्याही वेदनेशिवाय चालू लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
साईश्री हॉस्पिटलच्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनच्या टीमने डॉ. नीरज आडकर यांच्या नेतृत्वात हे नवीन तंत्रज्ञान वापरून अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. साईश्री हॉस्पिटल सारख्या जॉईंट रिप्लेसमेंट मधील नामवंत हॉस्पिटल मध्ये अशा प्रकारचे जॉईंट रिप्लेसमेंट चे तंत्रज्ञान विकसित होणे, म्हणजे ऑर्थोप्लास्टी क्षेत्रात नवीन क्रांती आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. नीरज आडकर म्हणाले की, “क्यूविस(CUVIS) जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही पारंपरिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी पेक्षा अधिक कार्यक्षम व अचूक असते. मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटत आहे की या तंत्रज्ञानाचा उपयोग आम्हाला ऑपरेशन थेटर मध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत आम्ही हे तंत्रज्ञान वापरून अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत व त्याचा फायदा रुग्णांना चांगल्या प्रकारे होत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “या नवीन तंत्रज्ञानाने मानवी चुका होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे तसेच अचूक अलाइनमेंट बदललेल्या जॉईंट ला अधिक सक्षम बनवते. आमच्या हॉस्पटिल मधील हे तंत्रज्ञान अतिशय अद्ययावत आम्ही ते सामान्य मनासाठी परवडणारे ठेवले आहे जेणेकरून सर्वजण त्याचा लाभ घेऊ शकतील.”
क्यूविस (CUVIS) रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ची ठळक वैशिष्ट्ये –
या तंत्रज्ञानामुळे जटिल व अवघड अशा शस्त्रक्रिया करताना सर्जनला अधिक अचूक काम करता येते.
जास्तीत जास्त अचूकता आणि कमी हाडाची कमी झीज झाल्यामुळे रक्त कमी वाहते त्यामुळे वेदनारहित, वेगवान आणि चांगल्या कार्यपद्धतीनंतरचे परिणाम मिळतात.
कमी मानवी हस्तक्षेपामुळे मानवी चुका होण्याची शक्यता कमी होते आणि इंट्रा ऑपरेटिव्ह संसर्ग होण्याची शक्यता कमी असते
लवकरात लवकर रुग्ण बरा होतो व त्यांना हॉस्पिटल मधून लवकर घरी जाता येते.
या प्रक्रियेत जास्तीतजास्त अचूकता व लवचिकता मिळते तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देखील ही प्रक्रिया सरस आहे.
या प्रक्रियेत सिटी स्कॅन च्या मदतीने रुग्णाच्या गरजेप्रमाणे थ्रीडी बोन मॉडेल तयार केले जाते एका विशिष्ट सॉफ्टवेअर च्या मदतीने या मॉडेलवर शस्त्रक्रियेचा क्रम ठरवला जातो व तो वापरून क्यूविस ही शस्त्रक्रिया पार पडते यामध्ये सर्वात महत्वाचे हाडांची जोडणी ही 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली जाते. त्यामुळे प्रत्येक रुग्णास समरस अशी शस्त्रक्रिया करणे सोपे होते.
अतिशय अचूकता असल्यामुळे रुग्णास शस्त्रक्रियेनंतर लवकर रिकव्हरी होते व चांगले परिणाम मिळतात.
पुणे, महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या अशा जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत आनंदित आहेत. जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेच्या 2 दिवसांच्या आत रुग्णांना घरी सोडण्यात आले तसेच त्यांची जीवनशैली पूर्वपदावर येण्यासाठी त्यांचे पुनर्वसन देखील चालू आहे.
क्यूविस (CUVIS) जॉईंट रोबोटिक सर्जरीच्या मदतीने मानवी चुका कमी होतात त्यामुळे रुग्णाला त्याचा अधिक फायदा होतो तसेच शस्त्रक्रियेच्या काही तासातच रुग्ण वेदनाविरहित चालू शकतो आणि पेनकिलरचा देखील वापर कमी करावा लागतो. त्यामुळेच रोबोटिक हे तंत्रज्ञान गुडघा दुखीच्या रुग्णांसाठी पर्वणीच आहे असे म्हणावे लागेल. क्यूविस (CUVIS) जॉइंट रोबोटिक सिस्टिम येत्या काळात जॉइंट रिप्लेसमेंट क्षेत्रात खात्री व ऑर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष देणारी आहे.
बँगलोरच्या साकरा वर्ल्ड हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्सचे संचालक आणि प्रमुख डॉ. चंद्रशेखर पी म्हणाले की, क्यूविस (CUVIS) जॉइंट टेक्नॉलॉजी कृत्रिम संयुक्त पुनर्स्थापनास रूग्णाला अधिक फायदेशीर ठरवते, कमी वेळात अधिक अचूकता मिळू शकते, ज्यामुळे रोपण आणि सांध्याचे दीर्घायुष्य देखील वाढते. मला हे ऐकून खूप आनंद झाला की पुण्यात आता क्यूविस(CUVIS) जॉइंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञान डॉ. नीरज आडकर यांच्या साईश्री रुग्णालयात स्थापन करण्यात आले आहे.”
























































