Baramati Plane Crash: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपले!- अरविंद सावंत

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.”अजित पवार हे एक धाडसी व्यक्तिमत्व होते. मी नेहमीच त्यांच्या शब्दाचा मान राखला आणि त्यांनी सांगितलेली कामे केली. बारामती परिसराच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोठे आणि मोलाचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.

खासदार अरविंद सावंत यांनी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत असल्याचे सांगत, “अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपले आहे. मी संपूर्ण पवार कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो,” असे ते यावेळी म्हणाले.

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

मोठी बातमी – बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू