
चला खेळूया ज्ञान वाढवूया या धर्तीवर 21 आठवडे चाललेल्या ज्ञानवर्धिनी स्पर्धेनंतर पुन्हा एकदा सहकार देवगिरी फाऊंडेशन यांनी नवीन स्पर्धा जाहीर केली आहे. सहकार देवगिरी फाऊंडेशनचे संचालक डॉ राजेंद्र जोशी आणि अनंत अंतरकर यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
ही स्पर्धा उद्या असलेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त आहे आणि स्पर्धेचे नाव आहे ‘महाराष्ट्रातील गड किल्ले’
स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे –
महाराष्ट्रातील कोणत्याही 5 गड – किल्ल्यांबद्दल प्रत्येकी 10 ओळीत माहिती द्यावी
ही माहिती मराठीतूनच असावी
ही माहिती आपण टाईप करून किंवा लिहून त्याचे फोटो काढून आम्हांला पाठवू शकता
ही माहिती आम्हांला 8108505126 या क्रमांकावर व्हाट्सअप करावी
आपली माहिती उद्या, शनिवार दिनांक 1 मे 2021 पासून परवा, रविवार 2 मे 2021 पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत स्विकारली जाईल
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल तर सर्वोत्तम अशा ५ स्पर्धकांना सहकार देवगिरी फाऊंडेशन तर्फे सन्मानपदक देण्यात येईल
सर्व स्पर्धकांनी आपल्या माहितीसोबत स्वतः चे नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर व ई – मेल ऍड्रेस पाठवावा
सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र pdf च्या स्वरूपात पाठविण्यात येईल तर सन्मानपदक विजेत्यांना पदक कुरिअर मार्फत पाठविण्यात येईल
स्पर्धेचा निकाल 8 मे रोजी जाहिर होईल व तो प्रत्येक स्पर्धकाला कळविण्यात येईल
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल व त्यावर कोणत्याही प्रकारे फोन वा व्हाट्सअप ग्रुप वर चर्चा केली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी
चला तर मग, सहकार देवगिरी फाऊंडेशनचा हा गड सर करायला तयार व्हा आणि बहुसंख्येने स्पर्धेत सहभागी व्हा असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे.





























































