बँकांचे या आठवड्यात तीन दिवसच काम

बँकांचे या आठवड्यात केवळ तीन दिवसच काम चालणार आहे. सोमवार, 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक, मंगळवार, 22 ऑक्टोबरला बँक कर्मचाऱयांनी पुकारलेला संप आणि 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार आल्याने बँकांचे व्यवहार 23 ते 25 ऑक्टोबरदरम्यानच (बुधवार, गुरुवार, शुक्रवार) सुरू राहणार आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यांतील बँकांचे व्यवहार या आठवडय़ात तीन दिवसच सुरू राहणार आहेत. अन्य राज्यांत मात्र केवळ मंगळवारीच बँका बंद राहणार आहेत. बँकांच्या विलिनीकरणाविरोधात ऑल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने एकदिवसीय संप पुकारला आहे. शनिवार, 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार असून 27 ऑक्टोबरला रविवारनंतर बँका थेट सोमवार, 28 ऑक्टोबरलाच सुरू होणार आहेत.

एटीएमवरच भरवसा

दिवाळीच्या तोंडावर बँका बंद असल्याने ग्राहकांना पैशांसाठी एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार आहे. या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणावर दिवाळीची खरेदी होणार असल्याने लोकांना पैशांसाठी एटीएमबाहेरच रांगा लावाव्या लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या