तिकीट कापल्याने ‘रावणा’लाही फटका

687

रावणदहन आणि विधानसभेच्या निवडणुकीचा संबंध काय, असा प्रश्न सर्वसामान्यांचा पडू शकतो. मात्र रावणाची निर्मिती करणाऱ्या नागपुरातील एका कलावंताला याचा फटका बसल्याने निश्चितच संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदा आपल्याला उमेदवारी मिळणारच, या विश्वासाने अनेकांनी प्रचारासाठी रावणदहनाच्या कार्यक्रमाचे बेत आखले होते. मात्र, यापैकी अनेकांना डच्चू देण्यात आल्याने त्यांनी कार्यक्रमच रद्द केले आहेत.

दसऱयाच्या दिवशी रावणदहनाची परंपरा आहे. नागपूर शहरासह विदर्भातील मोठय़ा प्रमाणात रावणदहनाचे कार्यक्रम घेतले जातात. रावण तयार करणारे काही मोजके कलावंत शहरात आहेत.यापैकी विनवार नावाचे बंधू सुमारे 50 वर्षांपासून हा व्यवसायकरीत आहेत. ते आता वृद्ध झाले आहेत. मात्र, पोटापाण्यासाठी नाईलाजाने त्यांनी व्यवसाय कायम ठेवला आहे. एका रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी सुमारे नव्वद हजार ते एक लाख रुपयापर्यंत खर्च येतो. यंदा निवडणूक असल्याने त्यांना 15 रावणाची प्रतिकृती तयार करण्याचे ऑर्डर मिळाली होती. अग्रीम म्हणून 10 हजार रुपयेसुद्धा देण्यात आले होते. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या ऑर्डर देणार्यापैकी काही इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे सहा जणांनी ऑर्डर रद्द केले. रावण तयार करण्यासाठी सर्व साहित्यआणले. महागडय़ा फटाक्यांची खरेदी केली. ऑर्डर रद्द झाल्यामुळे सर्व भुर्दंड बिनवार बंधूवर बसला आहे. आता हा खर्च कसा भरून काढायचा या विवंचनेत हे बंधू फिरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या