गोवंडी, मानखुर्दचा चेहरामोहरा बदलू! शिवसेनेचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू असो मुसलमान शिवसेनेने कधीच कोणाबद्दल भेदभाव केला नाही. शिवसेनेने सगळे आपलेच आहेत, अशा भावनेने समाजकार्य, राजकारण केले. मुस्लिमांच्या अनेक समस्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोडवल्या. या पुढेही शिवसेना-भाजप महायुतीच्या माध्यमातून शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्दचा चेहरा-मोहरा बदलून टापू आणि विकास घडवून आणू, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजाप महायुतीचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांच्या प्रचाराचा आरंभ विजय संकल्प मेळाव्याने करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय राऊत बोलत होते. ‘आमच्या विठ्ठलाने भगवा हाती धरला आहे. या विठ्ठलाला विजयी करून, हाच भगवा विधानसभेवर फडकवा,’ असे आवाहन त्यांनी यावेळी पेले. यावेळी विभागप्रमुख राजेंद्र राऊत, खासदार राहुल शेवाळे, खासदार मनोज कोटक, विभाग संघटक भारती बावदाने, भाजप मंत्री शरद कांबळे, नगरसेविका समीक्षा सव्रे, वैशाली शेवाळे, उपविभागप्रमुख तात्या सारंग, हेमंत साळवी उपस्थित होते.