चंद्रकांत दादांचे उलट पलट; आधी म्हणाले, सरकार पडेल या भ्रमात राहू नका, आता म्हणतात, मध्यावधी होतील

829

सरकार पडेल या भ्रमात आता राहू नका, सत्तेच्या स्वप्नातून बाहेर या अशा शब्दात कार्यकर्त्यांना उपदेशाचा डोस देणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी  राजकीय विसंवादातूनच महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि राज्यात विधानसभेच्या मध्यवधी निवडणुका होतील असे राजकीय भाकीत वर्तवले.

नवी मुंबईत रविवारी भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात भाषण करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी महाविकास आघाडीचे सरकार जाईल या भ्रमात राहू नका, सत्तेच्या स्वप्नातून बाहेर या असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. पण या विधानाला चोवीस तास उलटण्याच्या आत चंद्रकात पाटील यांनी पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असे सांगत स्वतःच्याच विधानाच्या परस्पर विरोधी विधान केले. भाजप  प्रदेश कार्यालयात  ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. हे  सरकार कोसळले  तरी भाजपला सरकार बनविण्यात रस नाही. आम्ही सत्ता  स्थापनेचा दावा केला नाही तर विधानसभा विसर्जित होऊन मध्यावधी निवडणुका होतील, असे भकित केले.

25 फेब्रुवारीला धरणे आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी तसेच शेतकरी आणि महिला अत्याचाराच्या प्रश्नावर भाजप 25 फेब्रुवारीला राज्यभर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या