बाजारहाट करताना…

578

> विद्युल्लता दळवी (संवादक)

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळतो आहे! पण…

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू केले आहेत. त्यामुळे ग्राहकवर्गही आनंदला आहे. तब्बल साडेतीन महिने बंद असलेले मॉल्स, बाजारपेठा काही नियम-अटींवर सुरू करण्यात आले आहेत. मॉल प्रशासनाकडून मॉलमध्ये प्रवेश करताना सॅनिटायझर, मास्क या उपाययोजनांबरोबरच थर्मल क्रिनिंग करून ग्राहकांचे स्वागत केले जात असले तरी ग्राहकांचीही तेवढीच जबाबदारी असल्याने ग्राहकांनी खरेदी करतांना काय काळजी घ्यायला हवी हे पाहूया.

 • शासनाच्या नियमानुसार मॉल्समध्ये येणाऱया ग्राहकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे खरेदी करतांना गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.
 •  ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर महिला यांनी खरेदीसाठी जाणे टाळायला हवे.
 • ग्राहकांनी खरेदीला जाताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
 • ग्राहकांनी चांगल्या दर्जाचा मास्क वापरावा. प्रत्येक दुकानामध्ये गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावताना काळजीपूर्वक लावा. हात लावल्यास हात सॅनिटाइझ करा. तो हात नाकातोंडाला लागणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे.
 • दरवाज्यांचे हॅण्डल, एलिव्हेटर यांना हात लावल्यावर हात सॅनिटाइझ करा. दुकानात काम करणारे कर्मचारी ग्राहकांच्या सुरक्षेबाबत सजग असतातच पण आपणही आपली काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
 • शक्यतो मॉलमध्ये जे कपडे घ्यायचे ते आपल्या मापानुसार घ्या ते घालून पाहू नका.
 • गर्भवती महिलांना लघवी फार काळ रोखता येत नाही. अशावेळी त्यांना मॉलमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नसते. मॉलमध्ये जरी दर दोन तासांनी टॉयलेटची स्वच्छता होत असली तरी गर्भवती महिलांनी तुमच्याजवळील हॅण्ड सॅनिटायझरने टॉयलेट सीट स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा.
 • खरेदीला जाताना घरून स्वतŠचे तापमान बघून जावे. सर्दी, खोकला असल्यास मॉलमध्ये जाऊ नये.
 • प्रत्येकाने आरोग्यसेतू ऍप डाऊनलोड करावे, जेणेकरून कोणाला कोरोनाची लागण झाली असल्यास किंवा त्याच्या संपर्कात कोणी आले असल्यास त्यांना शोधणं सोपं होतं.
 • खरेदीला गेल्यावर अनोळखी व्यक्तीसोबत विनाकारण जवळीक दाखवू नका.
 • शक्यतो ऑनलाइन पेमेण्ट करणे जास्त सुरक्षित आहे.
 • मॉलमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांनी पीपीई किट, हॅण्डग्लोव्हज्, डिस्पोजेबल गाऊन, मास्क, कॅप घालणे बंधनकारक आहे.
 • मॉलमध्ये, प्रत्येक दुकानात हॅण्ड सॅनिटायझर असणे बंधनकारक आहे. दुकानदारांनी त्याचे पालन करावे आणि ग्राहकांनीही मागणी करावी.
 • रस्त्यावर काहीही खाताना हात सॅनिटाइझ करून घ्या. शिजवलेले पदार्थच खा. चहा-कॉफीसाठी डिस्पोजेबल कप वापरा.
आपली प्रतिक्रिया द्या