
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जुलै 2025 पासून ही वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधिमंडळात केली. राज्यातील सुमारे 5.16 लाख शासकीय कर्मचारी तसेच सुमारे 8.72 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासकीय व इतर पात्र शासकीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 55 टक्क्यांवरून 58 टक्के वाढ करण्यात येणार आहे. वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च 2026 मध्ये देण्यात येईल. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री जायस्वाल यांनी स्पष्ट केले.


























































